Ad Advertisement Ad Advertisement

Bamu Students Know Your Leader – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दोन विद्यार्थिनींची निवड

कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते सत्कार Bamu Students Know Your Leader

छत्रपती संभाजीनगर: Bamu Students Know Your Leader – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील दोन विद्यार्थिनींची निवड ‘नो युवर लिडर’ स्पर्धेत झाली. या विद्यार्थिनीचा कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शालेय शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग आणि युवा कल्याण विभाग यांच्या समन्वयाने लोकसभा सचिवालयांतर्गत असलेल्या संसदीय लोकशाही संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ‘प्राइड’ तर्फे सन २०२२ पासून ‘नो युवर लीडर'(आपल्या नेत्याला जाणून घ्या) उपक्रमाचे आयोजन केले जाते. या उपक्रमाअंतर्गत महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री, सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाष चंद्र बोस आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी या महान नेत्यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

यापैकी ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शेख शिफा शमशु व अनिशा वसंत हांगे यांची निवड झाली. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाकरिता देशभरातील विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्थांकडून नामांकने मागवण्यात आली होती. यापैकी ३६ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधून १०८ सहभागींची निवड केली जाते.

विद्यापीठाद्वारे वक्तृत्व, वादविवाद व प्रश्नमंजुषा स्पर्धेत गुणवत्ता यादीत असलेल्या शेख शिफा शमशु, व अनिशा वसंत हांगे नामांकन करण्यात आले होते. यानंतर ‘प्राइड’ तर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांचे कार्य व कर्तृत्वविषयक ऑनलाईन वस्तुनिष्ठ परीक्षा, वक्तृत्व कौशल्य व भाषेवरील प्रभुत्व तसेच महान नेत्यांच्या जीवनकार्याविषयी सखोल ज्ञान असणे तसेच नेत्यांच्या विचारांची आधुनिक काळाशी सांगड घालणे इ. संदर्भात बहुस्तरीय परीक्षा घेऊन क्षमता तपासण्यात आली. यामध्ये शिफा शेख व अनिशा हांगे यांनी प्रावीण्य संपादन केल्यानंतर त्यांची निवड झाली आहे.

यशाबद्दल कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ संजय कवडे, विद्यार्थी विकासचे संचालक डॉ. कैलास अंभुरे, सांस्कृतिक समन्वयक गौतम सोनवणे यांची उपस्थिती होती.

Read About : Bamu 67th Convocation – हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मिळाले यशाचे प्रमाणपत्र
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.