Ad Advertisement Ad Advertisement

Bangladesh Measles Outbreak : बांगलादेशात गोवराचा कहर; १,१४७ बालकांचा मृत्यू, 2 लाखांहून अधिक संशयित रुग्ण

लसीकरणातील त्रुटी आणि आरोग्य सुविधांच्या कमतरतेमुळे गोवराच्या साथीचा उद्रेक; मृतांमध्ये ९४ टक्के मुले पाच वर्षांखालील असल्याची माहिती

ढाका : Bangladesh Measles Outbreak बांगलादेशात नियमित लसीकरण मोहिमेतील त्रुटींमुळे गोवराच्या साथीने थैमान घातले असून गेल्या आठ महिन्यांत १,१४७ मुलांचा मृत्यू झाला आहे. मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या या साथीमध्ये आतापर्यंत २,०२,००० हून अधिक संशयित रुग्ण आढळले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, या वर्षी बांगलादेशात जगातील इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत गोवराचे सर्वाधिक संशयित रुग्ण नोंदवले गेले आहेत. यापैकी २२,००० प्रकरणांना लॅब चाचणीत दुजोरा मिळाला असून, मृत्यू झालेल्यांमध्ये ९४ टक्के मुले ही ५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत. सप्टेंबर महिन्यात देशात दररोज सरासरी १,१९८ नवीन रुग्ण समोर येत होते.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ९५ टक्के लसीकरण असणे आवश्यक असते. मात्र, बांगलादेशात पहिल्या डोसचे कवरेज ९० टक्क्यांवर आणि दुसऱ्या डोसचे कवरेज ८६ टक्क्यांवर घसरले. युनिसेफच्या अहवालानुसार, ढिसाळ नियोजनामुळे तब्बल ४० टक्के मुलांची नोंदणीच झाली नव्हती. तसेच आरोग्य विभागातील एक तृतीयांश पदे रिक्त असल्याने दुर्गम आणि ग्रामीण भागातील मुलांपर्यंत आरोग्य कर्मचारी पोहोचू शकले नाहीत. चुकीच्या डेटा आणि अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे ही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

गोवराच्या एकूण रुग्णांपैकी एक तृतीयांश रुग्ण हे ५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञांनी बांगलादेश सरकारला ५ वर्षांवरील मुलांसाठीही तातडीने विशेष लसीकरण मोहीम राबवण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून ‘हर्ड इम्युनिटी’ (सामूहिक रोग प्रतिकारशक्ती) पुन्हा मिळवता येईल.

Read About : Normal Pressure Hydrocephalus : नॉर्मल प्रेशर हायड्रोसेफॅलसचा आजार जेष्ठांमध्ये वाढता

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.