Ad Advertisement Ad Advertisement

Pakistan Punjab Bus Accident : पाकिस्तानच्या पंजाबमध्ये प्रवासी बस उलटली; 10 जणांचा मृत्यू, 44 जखमी

कराचीहून डेरा गाझी खानकडे जाणाऱ्या बसचा राजनपूर जिल्ह्यात अपघात

लाहोर : Pakistan Punjab Bus Accident पाकिस्तानमध्ये राजनपूर जिल्ह्यातील रोझहान तहसीलमध्ये सिंधू हायवेवर बांग्ला हीदायत भागात एका प्रवासी बसचा ताबा सुटल्याने ती दुभाजकाला धडकून उलटली. या अपघातात १० प्रवासी ठार तर तर ४४ जण जखमी झाले. ही बस कराचीहून डेरा गाझी खानच्या दिशेने जात असल्याचे सांगण्यात आले.

रेस्क्यू ११२२ ने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे की, मृतांमध्ये सात पुरुष, दोन महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे.
जखमींपैकी ३८ प्रवाशांवर राजनपूर जिल्हा मुख्यालय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर गंभीर जखमी झालेल्या चार जणांना डेरा गाझी खान येथे आणि इतर दोन गंभीर जखमींना रहीम यार खान येथील शेख झायेद रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन यंत्रणांनी तात्काळ कारवाई केली. राजनपूर, जामपूर आणि रोझहान येथून १० रुग्णवाहिका आणि दोन बचाव वाहने घटनास्थळी रवाना करण्यात आली होती. या संपूर्ण बचाव मोहिमेत ३५ बचावकर्ते सहभागी झाले होते.

परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि बचावकार्यात समन्वय साधण्यासाठी राजनपूरचे डेप्युटी कमिशनर (डीसी) इम्रान रंझा, जिल्हा पोलीस अधिकारी आणि असिस्टंट कमिशनर देखील घटनास्थळी पोहोचले होते. डीसी रंझा यांनी सांगितले की, अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेलेला बस चालक आणि बसचा मालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल.

Read About :Ecuador Priest Death : धक्कादायक ! चर्चमध्ये प्रवचन देत असतानाच अंगावर पडला जड क्रॉस; थेट प्रक्षेपणादरम्यान पाद्रींचा अंत
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.