Ad Advertisement Ad Advertisement

Brain Visual Perception – तुमच्या मेंदूत ‘दृश्यम्’ तर सुरू नाही ना?

मेंदू एका सेकंदात १५ वेळा बदलतो दृश्यांची जाणीव; संशोधनातून महत्त्वाचा खुलासा, चेतनेचे गूढ उलगडण्यास मदत होण्याची शक्यता.

वॉशिंग्टन : Brain Visual Perception प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणच्या दृष्यमची थीम सर्वांनाच माहीत आहे. त्यात तो मुलीला वाचवण्यासाठी जे चित्र पोलिसांसमोर उभे करतो, त्यापेक्षा सत्य काही वेगळेच असते. मेंदूचेही तसेच आहे का? आपण जे पाहतो, तेच मेंदूला पूर्णपणे जाणवते का? नव्या संशोधनानुसार, मेंदू जाणीवपूर्वक दिसणाऱ्या दृश्यासोबतच नकळत राहिलेल्या दृश्याचीही माहिती प्रक्रिया करत असू शकतो. संशोधकांना मेंदूतील मज्जापेशींची क्रिया एका सेकंदात सुमारे १५ वेळा या दोन दृश्यांशी संबंधित नमुन्यांमध्ये बदलताना आढळली. या निष्कर्षांमुळे मानवी चेतना कशी कार्य करते, याविषयी नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.

कॅलिफोर्निया विद्यापीठाचे संशोधक जॅनिस हेसे आणि डोरिस त्साओ यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास करण्यात आला. संशोधनात ‘बायनॉक्युलर फ्लॅश सप्रेशन’ या तंत्राचा वापर केला. यात दोन्ही डोळ्यांना वेगवेगळी चित्रे दाखवली जातात. अचानक दुसरे चित्र दाखवल्यानंतर ते जाणीवेत ठळकपणे दिसते, तर पहिले चित्र डोळ्यांना दिसत असूनही जाणीवेतून बाजूला पडते. प्रथम १४ मानवी स्वयंसेवकांवर हा दृश्यभ्रम तपासण्यात आला. त्यानंतर दोन माकडांच्या मेंदूतील मज्जापेशींच्या हालचाली इलेक्ट्रोडच्या मदतीने नोंदवण्यात आल्या. यासाठी दृश्य प्रक्रिया आणि चेहरा ओळखण्याशी संबंधित मेंदूच्या भागांचा अभ्यास करण्यात आला. Brain Visual Perception

जाणीव आणि नकळत माहितीची अदलाबदल

मेंदूची क्रिया केवळ जाणीवेत असलेल्या चेहऱ्यापुरती मर्यादित नव्हती. ती सुमारे सेकंदाला १५ वेळा जाणीवेत असलेल्या आणि दडलेल्या चेहऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नमुन्यांमध्ये बदलत होती. संशोधकांना या मज्जासंकेतांमधून दोन्ही चेहरे पुन्हा ओळखताही आले. Brain Visual Perception

दोन वास्तवांचा अनुभव नव्हे!

याचा अर्थ माणूस सेकंदाला १५ वेळा दोन वेगवेगळ्या वास्तवांचा अनुभव घेतो, असा नाही. जाणीवेत नसलेली माहितीही मेंदूत प्रक्रिया होत राहू शकते, एवढाच या निष्कर्षांचा संकेत आहे. हे संशोधन अद्याप प्राथमिक स्वरूपाचे असून त्याचे समवयस्क तज्ज्ञांकडून परीक्षण झालेले नाही. शिवाय, मज्जासंकेतांची नोंद केवळ दोन माकडांमध्ये करण्यात आली. त्यामुळे चेतनेचे गूढ उलगडण्यासाठी आणखी संशोधन आवश्यक आहे. Brain Visual Perception

Read About : Ayush Hospital Land Issue – छत्रपती संभाजीनगरच्या आयुष रुग्णालयाचा जागेअभावी प्रश्न रखडला!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.