Ad Advertisement Ad Advertisement

DZIP3 Protein and Antiviral Immunity : विषाणू ओळखणारी पेशींमधील यंत्रणा शोधली

हैदराबादच्या सीएसआयआर-सीसीएमबीमधील संशोधकांचा महत्त्वपूर्ण शोध; भविष्यात परिणामकारक अँटीव्हायरल औषधांच्या निर्मितीला चालना

हैदराबाद : DZIP3 Protein and Antiviral Immunity विषाणूंनी शरीरात प्रवेश करताच शरीराची रोगप्रतिकार शक्ती त्याच्याशी दोन हात करायला सुरुवात करते, परंतु त्यांना विषाणू शिरल्याचा आलर्ट कोण देतो, हे आतापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. हैदराबाद येथील ‘सीएसआयआर-सेंटर फॉर सेल्यूलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी’ (सीएसआयआर-सीसीएमबी) मधील शास्त्रज्ञांनी मानवी पेशींमधील एक अत्यंत महत्त्वपूर्ण यंत्रणा शोधून काढली असून तीच पेशींमध्ये विषाणूचा प्रवेश होताच रोगप्रतिकारक शक्तीला सतर्क करण्याचे काम करते.

डॉ. संतोष चौहान यांच्या नेतृत्वाखालील टीमने केलेल्या या संशोधनाचे निष्कर्ष प्रसिद्ध आणि नामांकित ‘द ईएमबीओ जर्नल’मध्ये प्रकाशित झाले आहेत. या अभ्यासाच्या मुख्य लेखिका डॉ. रिंकू साहू असून, भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाकडून (डीबीटी) या संशोधनाला आर्थिक सहाय्य मिळाले आहे.

जेव्हा एखादा विषाणू पेशीमध्ये प्रवेश करतो, तेव्हा ‘डीझेडआयपी३’ नावाचे प्रथिन विषाणूचे आरएनए ओळखून स्वत: सक्रिय होते. सक्रिय झाल्यानंतर हे प्रथिन पेशीचे ऊर्जाकेंद्र असलेल्या ‘मायटोकॉन्ड्रिया’मध्ये जाऊन मुख्य प्रतिकारशक्ती प्रथिनांना सक्रिय करते. यामुळे शरीरात ‘टाइप-१ इंटरफेरॉन्स’ तयार होतात, जे विषाणूंना शरीरात वाढण्यापासून रोखतात.हा नवीन मार्ग सार्स-कोविड २ (कोरोना), चिकुनगुनिया आणि जापानी एन्सेफलायटिस (मेंदूज्वर) यांसारख्या अनेक धोकादायक विषाणूंविरुद्ध मजबूत संरक्षण प्रदान करतो.DZIP3 Protein and Antiviral Immunity

नव्या औषधांच्या निर्मितीची आशा

या शोधाच्या आधारे डॉ. चौहान यांची टीम आता अशी औषधे विकसित करत आहे, जी या ‘डीझेडआयपी३’ प्रथिनाला कृत्रिमरीत्या अधिक सक्रिय करतील.यामुळे भविष्यात येणाऱ्या नवीन विषाणूजन्य आजारांवर आणि साथीच्या रोगांवर उपचारासाठी ‘ब्रॉड-स्पेक्ट्रम अँटीव्हायरल थेरपी’ तयार करणे शक्य होणार आहे. DZIP3 Protein and Antiviral Immunity

‘डीझेडआयपी३’ हे प्रथिन विषाणूच्या आरएनएला कसे ओळखते आणि पेशीच्या प्रतिकारशक्तीला कसे सक्रिय करते, हे समजल्यामुळे मानवी रोगप्रतिकारक शक्तीबद्दलची आपली समज अधिक सखोल झाली आहे. या नैसर्गिक पेशी संरक्षण यंत्रणेचा वापर करून भविष्यातील नवीन विषाणूजन्य धोक्यांवर प्रभावी उपचार शोधण्याचे नवे मार्ग खुले झाले आहेत.DZIP3 Protein and Antiviral Immunity

  • डॉ. संतोष चौहान, वरिष्ठ मुख्य शास्त्रज्ञ, सीएसआयआर-सीसीएमबी

Read About: Science of Laughter – हसू आवरता आवरेना, मेंदूत नेमकं काय घडतं? अनावर हास्यामागचं गुपित उघड

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.