Ad Advertisement Ad Advertisement

Flavio Bolsonaro Fleeing to US : पराभूत राष्ट्राध्यक्ष उमेदवार बोल्सोनारोंचे अमेरिकेत पलायन

ब्राझीलच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या पुत्राने देश सोडल्याचा दावा; न्यायालयाच्या निर्बंधांनंतर बनावट ताफे आणि इटालियन पासपोर्टचा वापर केल्याचे वृत्त

ब्राझिलिया : Flavio Bolsonaro Fleeing to US ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर, उजव्या विचारसरणीचे नेते आणि माजी राष्ट्राध्यक्ष जॅर बोल्सोनारो यांचे पुत्र फ्लॅव्हियो बोल्सोनारो यांनी गुप्तपणे अमेरिकेत पलायन केले आहे. ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने पासपोर्ट जप्त करण्याचे आदेश दिलेले असतानाही त्यांनी चकवा देत बुधवारी गाठलेले मियामी शहर सध्या जागतिक राजकारणात चर्चेचा विषय बनले आहे. अमेरिकेत पोहोचताच त्यांनी निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत त्यांनी स्वत:ला ब्राझीलचा खरा नेता घोषित केले आहे.

असे केले पलायन…
  • भारतीय वेळेनुसार सोमवारी (२६ ऑक्टोबर) निवडणुकीतील पराभवानंतर फ्लॅव्हियो बोल्सोनारो यांनी एक छोटेखानी भाषण केले. त्यांनी निकाल स्वीकारण्यास नकार देत निवडणूक रद्द करण्याची मागणी केली.
  • मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने बोल्सोनारो यांच्याविरोधात सुरू असलेल्या विविध आरोपांच्या तपासाच्या पार्श्वभूमीवर त्यांना देश सोडण्यावर बंदी घातली आणि पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले. बोल्सोनारो यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत ”मी कुठेही जाणार नाही आणि पासपोर्ट जमा करेन” असा दावा केला.
  • मंगळवारी संध्याकाळी ब्राझिलिया येथील त्यांच्या निवासस्थानातून अधिकृत ताफा बाहेर पडताना दिसला. मात्र, पोलिसांचे लक्ष भरकटवण्यासाठी ताफ्याची विभागणी करून दोन गट करून ते दोन दिशांनी गेले. त्यातील एक ताफा बनावट होता. इकडे ब्राझील प्रशासनाने त्यांचे ब्राझिलियन व मुत्सद्दी म्हणून जारी केलेले पासपोर्ट रद्द केले. रात्री बोल्सोनारो यांनी खासगी जेटद्वारे देश सोडल्याचे त्यांच्या पक्षातर्फे जाहीर करण्यात आले.
  • बुधवारी ब्राझिलियापासून १,५०० किमी अंतर पार करून बोल्सोनारो आंतरराष्ट्रीय पुलावरून अर्जेंटिनामध्ये दाखल झाले. त्यांच्याकडे इटालियन पासपोर्ट असल्याने अर्जेंटिनामधून प्रवास करणे शक्य झाले.
  • बुधवारीच अर्जेंटिनामधून प्रायव्हेट जेटने उड्डाण करत त्यांनी इक्वेडोरच्या गुयाकिल विमानतळावर इंधन भरण्यासाठी अल्प विश्रांती घेतली आणि तिथून थेट फ्लोरिडाच्या मियामी येथील ओपा-लोका विमानतळावर उतरले.
अमेरिकेचा पाठिंबा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बोल्सोनारो कुटुंबाला अमेरिकेत येण्याची विशेष परवानगी दिल्याची पुष्टी केली आहे. बोल्सोनारो आता अमेरिकेतूनच ब्राझीलच्या राजकारणातील आपले अस्तित्त्व कायम ठेवण्याच्या मन:स्थितीत आहेत. दरम्यान, ब्राझील पोलिसांच्या अधिकृत नोंदीत त्यांच्या देश सोडण्याची कोणतीही नोंद नसून, त्यांनी पासपोर्ट जमा न केल्याप्रकरणी पोलीस सध्या तपास करत आहेत.

Read About : US AI Regulation : अमेरिकेत एआयवर कठोर कायदे होण्याची शक्यता कमी; यूबीएसचा अहवाल

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.