Ad Advertisement Ad Advertisement

Hingoli forced loan recovery फायनान्स कंपन्यांची बळजबरीने कर्जवसुली सुरूच – 3 NOV

सेनगाव : क्रांतीकारी शेतकरी संघटनेने कर्मचाऱ्याला वाघजाळीतून हुसकावले

Hingoli forced loan recovery सेनगाव (जि.हिंगोली) : शासनाचे स्पष्ट आदेश आणि मार्गदर्शक तत्वे असतानाही हिंगोली जिल्ह्यात खासगी फायनान्स कंपन्यांचे वसुली कर्मचारी अद्यापही कर्जदारांच्या विशेषत: महिला बचत गटांच्या घरी जाऊन वसुलीसाठी सक्तीचा तगादा लावत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथे अशीच बळजबरीने कर्जवसुली करणाऱ्या विदर्भातील एका नामांकित फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच जाब विचारत गावातून हुसकावून लावले. यापुढे जिल्ह्यात कुठेही वसुलीसाठी कर्मचारी फिरकल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा सज्जड दमही संघटनेने दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथे मंगळवारी (दि.३) एका खासगी फायनान्स कंपनीचा वसुली कर्मचारी गावात दाखल झाला होता. त्याने गावातील गरीब व शेतमजूर महिला बचत गटांतील कर्जदारांकडे जाऊन हप्ते भरण्यासाठी सक्ती सुरू केली. महिलांनी आपली अडचण सांगूनही कर्मचारी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता.या प्रकाराची माहिती मिळताच क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे आणि जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी सहकाऱ्यांसह तातडीने वाघजाळी गावात धाव घेतली.
पदाधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला शासनाच्या नियमांची आठवण करून देत जाब विचारला. त्यावर ‘वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशामुळे आलो’ असे कर्मचाऱ्याने सांगताच, कावरखे यांनी थेट कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी फोनवरून संपर्क साधला.

मात्र,संबंधित अधिकाऱ्याने ‘आमचा कर्मचारी वसुलीसाठी आला होता काय?’ असा उलट प्रश्न करीत हात झटकण्याचा प्रयत्न केला. आधिकाऱ्याच्या या टोलवाटोलवीवर संतापलेले मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांनी त्याला चांगलेच धारेवर धरले. ‘तुमचा कर्मचारी गावात वसुलीसाठी आला नाही तर मग काय कर्जदारांना दिवाळीचे कपडे देण्यासाठी आला होता काय?’ असा तिखट आणि सडेतोड सवाल कावरखे यांनी करताच संबंधित अधिकारी निरुत्तर झाला. यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत वसुली कर्मचाऱ्याला यापुढे हिंगोली जिल्ह्यात…तर कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार कुठेही कर्ज वसुलीसाठी न फिरकण्याचा इशारा देत गावातून हुसकावून लावले.

…तर कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार

सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे.शेतकरी, शेतमजूर आणि महिला बचत गटांसमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशा संकटाच्या काळात शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही फायनान्स कंपन्यांकडून होणारी सक्ती अत्यंत निषेधार्ह आहे.यापुढे कोणत्याही फायनान्स कंपनीचा कर्मचारी ग्रामीण भागात वसुलीसाठी आल्यास,संघटना त्याच्यावर थेट गुन्हे दाखल करेल आणि संबंधित कंपन्यांना धडा शिकवेल,’ असा इशारा क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांनी दिला आहे. तसेच,कुठेही अशी सक्ती होत असल्यास नागरिकांनी तात्काळ संघटनेशी संपर्क साधावा,असे आवाहनही जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी केले आहे.

Read About : Naigaon hydropower project – सोयगावातील नायगाव जलविद्युत प्रकल्प तत्काळ रद्द करा
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.