Ad Advertisement Ad Advertisement

Indian Air Ambulance Emergency Landing in Bangladesh : 12 हजार फुटांवर उघडला विमानाचा दरवाजा

भारतीय एअर ॲम्ब्युलन्सचे बांगलादेशात आपत्कालीन लँडिंग, रुग्ण महिलेचा मृत्यू

Indian Air Ambulance Emergency Landing in Bangladesh: ढाका : त्रिपुराची राजधानी आगरताळ्याहून कोलकात्याकडे निघालेल्या एका भारतीय एअर ॲम्ब्युलन्सचा दरवाजा तांत्रिक बिघाडामुळे अशंत: उघडल्याने विमानाचे बांगलादेशात आपत्कालीन लँडिंग करावे लागले. या अत्यंत थरारक आणि दुर्दैवी घटनेत विमानातील ५६ वर्षीय भारतीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.


‘बीचक्राफ्ट किंग एअर सी९० ए’ हे एअर ॲम्ब्युलन्स रविवारी महिला रुग्णाला घेऊन आगरताळ्याहून कोलकात्याकडे निघाले होते. विमान तब्बल १२ हजार फूट उंचीवर असताना तांत्रिक बिघाडामुळे अचानक त्याचे दार काही प्रमाणात उघडले गेले. यामुळे विमानात एकच खळबळ निर्माण झाली. या गंभीर संकटकाळात वैमानिकांनी प्रसंगावधान राखत विमानाला ढाक्यातील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुखरूप उतरवले.

विमानात दोन वैमानिक, एक रुग्ण, एक डॉक्टर, एक पॅरामेडिक आणि रुग्णाचे दोन नातेवाईक, अशा एकूण सात जणांचा समावेश होता. विमान सुरक्षित खाली उतरल्यानंतर रुग्ण अंजना भौमिक यांना तातडीने कुर्मीटोला मल्टिकेर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, विमानातील तांत्रिक बिघाडामुळे हा मृत्यू झाला की आधीच्या गंभीर आजारामुळे झाला, याबाबतची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. तर विमानातील इतर सर्व जण पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे.

मानवी दृष्टिकोनातून तातडीने मदत

या घटनाक्रमादरम्यान आंतरराष्ट्रीय लँडिंगची पूर्वपरवानगी नसताना बांगलादेश प्राधिकरणने मानवी दृष्टिकोनातून एअर ॲम्ब्युलन्सला तातडीने मदत केली. यानंतर ढाक्यातील भारतीय उच्चायोगाने स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आवश्यक सर्व राजनैतिक प्रक्रिया तातडीने पूर्ण केल्या.

Read About : SKY-001 AI Model : भारतीय उद्योजकाने तयार केला चॅटजीपीटीपेक्षा भारी एआय! GPT-6 Astra पेक्षा १५० पट स्वस्त

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.