Ad Advertisement Ad Advertisement

Under 14 Cricket Team MCA – ‘एमसीए’ आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगरचा अंडर १४ संघ घोषित

तन्मय औरादेची कर्णधारपदी तर अर्जुन शेळकेची उपकर्णधारपदी निवड

छत्रपती संभाजीनगर : Under 14 Cricket Team MCA – महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे (एमसीए) आयोजित करण्यात आलेल्या १४ वर्षांखालील आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्ह्याचा अंडर १४ क्रिकेट संघ जाहीर करण्यात आला. तन्मय औरादे याची कर्णधार आणि अर्जुन शेळके याची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली.

जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर अंडर १४ क्रिकेट संघाची घोषणा अनिल इरावणे, करण डोगरा यांनी केली. अंडर १४ क्रिकेट आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धा १३ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. संघात तन्मय औरादे (कर्णधार), अर्जुन शेळके (उपकर्णधार), आरव पवार, आदर्श घोलप, साई गुंड, श्लोक राठोड, कार्तिक घाटगे, दिपेश बोर्डे, दर्शिल लोखंडे, आयुष बेदमुथा, सुर्यांश यादव, अहमद अली, सोहम पिंपळे, श्री कुलकर्णी. राखीव – श्लोक मोरे. झोन क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू – अहान मुथा, यशराज उगले, राज जगताप, अंश यादव. अंडर १४ : २५ खेळाडूंची निवड : अर्जुन शेळके, श्लोक राठोड, आरव पवार, आदर्श घोलप, साई गुंड, कार्तिक घाटगे, तन्मय औरादे, दिपेश बोर्डे, सोहम पिंपळे, दर्शिल लोखंडे, आयुष बेदमुथा, अहमद अली, राज जगताप, यशराज उगले, केतन पारखे, श्लोक मोरे, आशिष चौधरी, श्रीरंग कुलकर्णीे, अहान मुथा, सुर्यांश यादव, वेद महाजन, राजस जोशी, अब्दुल गणी, अंश यादव, इशाह चार्ल्स आदी.

Read About : Historic Educational Institutions Fund – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक वारशाचे जतन होणार
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.