Ad Advertisement Ad Advertisement

Uttarakhand Helicopter Crash – बद्रीनाथ धामहून परतणारे हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह 6 जणांचा मृत्यू

चमोली जिल्ह्यातील हत्ती पर्वत परिसरात ट्रान्स भारत एव्हिएशनचे हेलिकॉप्टर कोसळले; खराब हवामानामुळे अपघात झाल्याची शक्यता

डेहराडून : Uttarakhand Helicopter Crash उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. श्री बद्रीनाथ धामहून डेहराडूनच्या सहस्त्रधारा हेलिपॅडकडे प्रवाशांना घेऊन जात असलेले ट्रान्स भारत एव्हिएशनचे एक हेलिकॉप्टर चमोली जिल्ह्यातील हत्ती पर्वत परिसरात कोसळले. या भीषण अपघातात पायलटसह हेलिकॉप्टरमधील सर्व ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रान्स भारत एव्हिएशन चे हेलिकॉप्टर ५ प्रवासी आणि १ पायलटला घेऊन बद्रीनाथहून रवाना झाले होते. मात्र, जोशीमठ खोऱ्यातून जात असताना अचानक या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला आणि त्याचे लोकेशन गायब झाले. चांई आणि थँग गावाच्या वरून जात असताना परिसरातील खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. दुर्घटनेदरम्यान लष्कराच्या सिग्नल सेंटरच्या एका टीमने हेलिकॉप्टरमधून धूर निघताना आणि ते वेगाने खाली कोसळताना पाहिले होते.

अपघाताची माहिती मिळताच चमोलीचे जिल्हाधिकारी गौरव कुमार, जिल्हा प्रशासन, एसडीआरएफ आणि लष्कराच्या तुकडीने संयुक्तपणे तातडीने शोध आणि बचाव मोहीम (रेस्क्यू ऑपरेशन) सुरू केली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले असून ते स्वतः या संपूर्ण बचाव कार्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत. या दुर्घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून उत्तराखंड नागरी उड्डाण विकास प्राधिकरणाने ट्रान्स भारत एव्हिएशनच्या सर्व हेलिकॉप्टरच्या उड्डाणांवर तूर्तास बंदी घातली आहे.

मृतांची नावे खालीलप्रमाणे आहेत

  • पायलट: कैप्टन हिमांशु
  • प्रवासी: प्रताप, अरुण, शंकर गौडा, सुधीर के आणि एच.एस. नटराज

Read About : Aundha Nagnath Fire – औंढा नागनाथ येथे भीषण आग; 6 दुकाने जळून खाक
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.