करमाड ठाण्यात गुन्हा : कार अन् हायवाला केले लक्ष्य
छत्रपती संभाजीनगर : Samruddhi Highway Stone Attack आधी दरोड्यामुळे आणि आता थेट वाहनांवरील दगडफेकीमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. २ नोव्हेंबरला कल्याणजवळील आमणे टोल नाक्याजवळ शासकीय अभियंत्याला लुटल्याची घटना ताजी असतानाच करमाडजवळ थेट दोन वाहनांवर दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला. रविवारी (दि. १) रात्री ११ वाजेच्या सुमारास नागरपूरकडे जाताना चॅनल क्र ३९७ ते ३९८ यादरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी ३ नोव्हेंबरला करमाड ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समृद्धी महामार्ग हा प्रवासासाठी जितका गतीमान समजला जातो तितक्याच गतीने त्यावरील गुन्हेगारी वाढू लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दरोड, लुटमारीमुळे महामार्ग पोलिसांसोबतच स्थानिक पोलिसांनी गस्त वाढविलेली असतानाही गुन्हे थांबण्याचे नाव घेत नाहीत. परमेश्वर शेषराव पंजरकर (४२, रा. नक्षत्रवाडी) हे १ नोव्हेंबरला रात्री साडेआठ वाजता मित्र अमोल पाटील यांच्यासह अर्टिका कारने (एमएच २०, जीई २१६२) संभाजीनगरहून नागपुरला निघाले. ते करमाड एन्ट्री पॉइंटवर समृद्धी महामार्गावर चढले. ते चॅनल क्र ३९७ ते ३९८ दरम्यान जाताच रात्री १० वाजेच्या सुमारास त्यांच्या कारच्या समोरील काचेवर दगड आदळला. त्यात काचेला तडे गेले. मात्र, घाबरल्यामुळे ते न थांबताच जालना-नागपूरच्या दिशेने निघून गेले.
हायवालाही केले लक्ष्य
समृद्धी महामार्गवर चॅनेल क्रमांक ३९७ आणि ४५१ दरम्यान, रविवारच्या रात्री १० वाजेच्या सुमारास एमएच ४० सीडी ५७३५ क्रमांकाच्या हायवावर दगडफेक करण्यात आली. हा हायवाही नागपूरच्या दिशेने जात होता. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले; मात्र तोपर्यंत दगडफेक करणारे आरोपी पसार झाले होते. मंगळवारी या घटनेची नोंद समृद्धी महामार्गाच्या नियंत्रण कक्षात करण्यात आली. विशेष म्हणजे, करमाड परिसरात गेल्या आठ दिवसांत दगडफेकीच्या दोन घटना घडल्या आहेत. आठ पोलीस वाहने गस्त घालत असतानाही दगडफेक होत असल्याने महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
Read About : Husband Suicide After Wife Affair – पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची सासरवाडीतच आत्महत्या
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.