डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा
छत्रपती संभाजीनगर : BAMU Students Examination Fee Waiver – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी बसलेल्या २ लाख ९६ हजार ११४ विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचा लाभ मिळाला आहे. तर शुल्क भरलेल्या ५१ महाविद्यालयातील २५ हजार ०७४ विद्यार्थ्यांचे शुल्क दिवाळी सुट्टीत कार्यालय सुरु ठेऊन परत करण्यात आले आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा शुल्क माफीचा निर्णय प्रभावीपणे अंमलात आणण्यात आले असून एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहु नये यासाठी विद्यापीठ स्तरावरीळ टास्क फोर्स व परीक्षा विभागाने काम केले आहे.
विद्यापीठातर्फे परीक्षेचे वेळापत्रक, मुल्याकंन केंद्र स्थापन करण्यात आले असून पारदर्शक रितीने परीक्षा घेण्यासाठी परीक्षा विभागाने सर्व प्रयत्न केले. विद्यापीठाच्या पदवी परीक्षा २७ ऑक्टोबरपासून सुरु झाल्या आहेत. या परीक्षांमध्ये बी.ए, पदवी, बी.एस्सी, बी.कॉम यासह एकुण १४ पदवी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. तर सर्व व्यावसायिक व पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा २१ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. दरम्यान, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व विद्यापीठांचे कुलगुरू व संवैधानिक अधिकारी यांची बैठक घेऊन राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून घेतलेल्या परीक्षा शुल्क माफीचा लाभ देण्याचे निर्देश दिले.
तसेच उच्च शिक्षण शिक्षण संचालक डॉ . शैलेंद्र देवळाणकर यांनी वेळोवेळी सूचना व परिपत्रक जारी करून या शुल्क माफीच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठामार्फत शासनाने घेतलेल्या निर्णयाची योग्य व प्रभावीपणे अंमलबजावणी विद्यापीठामार्फत करण्यात आली. तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालातील दुष्काळग्रस्त विद्यार्थी शासनाने जाहीर केलेल्या योजनेपासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे कुलगुरु डॉ. फुुलारी यांनी निर्देश दिले.
दिवाळी सुट्टीत धनादेश वाटप
दिवाळी सुटीच्या काळात ६ व ७ नोव्हेंबर या दोन दिवशी परीक्षा विभागातील समन्व्य विभाग सुरु ठेवण्यात आला. एकूण ५१ महाविद्यालयातील २५ हजार ७४ विद्यार्थ्यांनी १ कोटी ८८ लाख ३३ हजार ७६१ रुपये एवढे परीक्षा शुल्क जमा केले होते. यातील ३४ महाविद्यालयांनी १ कोटी ३६ लाख ४४ हजार ७५६ रुपयांचे धनादेश परत दिवाळी सुट्टीत परत नेले आहेत. संबंधित महाविद्यालयांनी या विद्यार्थ्यांना तात्काळ शुल्क परत करावेत, असे डॉ. बी. एन. डोळे यांनी कळविले आहे.
Read About : Historic Educational Institutions Fund – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक वारशाचे जतन होणार
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.