Ad Advertisement Ad Advertisement

Illegal Plotting Action – श्रीराम मंदिर ट्रस्टवर महापौरांसह भाजप नेते सदस्य असल्यानेच अवैध प्लॉटिंगवरील कारवाई थांबवली

मनपा विरोधी पक्षनेत्यांचा आरोप : श्रीराम मंदिराच्या जागेच्या संरक्षणाची केली मागणी

छत्रपती संभाजीनगर : Illegal Plotting Action : शहरातील विविध भागातील अवैध प्लॉटिंगवरील कारवाया महापालिकेने पूर्ण केल्याशिवाय जागेवरून पाय काढला नाही, मात्र जाधववाडीतील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या वर्ग २ च्या जागेवरील अवैध प्लॉटिंगवरील कारवाई कोणाच्या सांगण्यावरून थांबविण्यात आली, याठिकाणी केवळ १० टक्केच कारवाई केली, अवैध प्लॉट विक्रीसाठी याठिकाणी थाटलेले कार्यालय तसेच इतर मुलभूत सुविधा आजही कायम आहेत, त्यावर बुलडोजर चालवून प्लॉटिंग पूर्णपणे उद्ध्वस्त का नाही केली, असा सवाल उपस्थित करत, या ट्रस्टवर महापौरांसह भाजप नेते हे सदस्य असल्याचा आरोप मनपा विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर यांनी गुरुवारी (दि.१२) पत्रकार परिषदेत केला.

समीर साजिद बिल्डर म्हणाले की, जाधववाडी बाजार समितीसमोर गट नंबर १२४ व १२५ मधील सुमारे ४१ एकर जमीन ही वर्ग २ मधील आहे, ही जागा श्रीराम मंदिर संस्थान बालाजी मठाच्या नावे आहे. या जागेवर काही लोकांनी अनधिकृत प्लॉटिंग करून ते विक्री केले, सुमारे ९० टक्क्यापेक्षा जास्त प्लॉट विक्री झालेले आहेत. या अवैध प्लॉटिंगबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर २९ सप्टेंबर रोजी मनपा आयुक्तांना पत्र देऊन कारवाईची मागणी केली होती, मनपाच्या अतिक्रमण विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या पथकाने ३० सप्टेंबर रोजी कारवाई केली. ज्याप्रमाणे शहरातील इतर जागांवरील अवैध प्लॉटिंग पथकाने पूर्णत: उद्ध्वस्त केल्या, त्याचप्रमाणे राममंदिराच्या जागेवरील अवैध प्लॉटिंगवर कारवाई झाली नाही. कोणाच्या आदेशाने ही कारवाई थांबविण्यात आली., अवैध प्लॉटिंगचे गट नंबर महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन ब्लॉक केले, मात्र गट नंबर १२४ व १२५ अद्यापही ब्लॉक का केले नाही, प्लॉटिंग पाडणाऱ्यांवर गुन्हेही दाखल का करण्यात आले नाहीत, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

श्रीराम मंदिराच्या जागेचे संरक्षण व्हावे

ट्रस्टला दिलेली जागा ही वर्ग २ ची असून, या जागेचा वापर सामाजिक उपयोगासाठी व्हावा, मंदिराच्या जागेवर प्लॉटिंग व्हायला नको होती, हे प्लॉट विक्री करून सर्वसामान्यांची फसवणुक करण्यात आली आहे, असे सांगत श्रीराम मंदिराच्या जागेचे संरक्षण व्हावे, ही जागा विक्री व्हायला नको, अशी मागणीही विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर, नगरसेवक ओसामा कदिर मौलाना यांनी यावेळी केली.

महापौरांसह भाजप नेते ट्रस्टचे सदस्य?

श्रीराम मंदिर ट्रस्टमध्ये महापौर, शहरातील आमदार, मंत्री यांच्यासह भाजपचे नेते हे सदस्य आहेत. महापौरांच्या आदेशानेच मनपा प्रशासनाने श्रीराम मंदिरच्या जागेवरील अवैध प्लॉटिंगवरील कारवाई थांबविण्यात आली आहे. हा मुद्दा आम्ही उद्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेत उचलून जाब विचारणार आहे. : समीर साजिद बिल्डर, विरोधी पक्षनेता.

विरोधी पक्षनेत्यांनी एका ओळीचा पुरावा दाखवावा

श्रीराम मंदिर ट्रस्टमध्ये समीर सुभाष राजूरकर असे नाव असल्याचा एका ओळीचा पुरावा विरोधी पक्षनेत्यांनी दाखवावा. या जागेवरील अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाईसाठी मी सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र गुन्हा दाखल का होत नाही, याबाबत पोलीस प्रशासनच सांगू शकेल.: समीर राजूरकर, महापौर.

Read About : Mahayuti alliance tensions in Maharashtra- महायुतीत पुन्हा धुसफूस?

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.