Ad Advertisement Ad Advertisement

Sharad Tak LNG Port Project : शरद टाक टेक्सास किनाऱ्यावर उभारणार 68000 कोटींचे बंदर

भारतीय अमेरिकी उद्योजक शरद टाक यांच्या ST LNG कंपनीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प; २०२७ मध्ये बांधकामाला सुरुवात, २०२९ पर्यंत बंदर कार्यान्वित होण्याचे उद्दिष्ट

वॉशिंग्टन : Sharad Tak LNG Port Project अमेरिकेच्या वाहतूक विभागाने भारतीय-अमेरिकी उद्योजक शरद टाक यांच्या ‘एसटी एलएनजी’ या कंपनीला टेक्सासच्या किनाऱ्याजवळ खोल समुद्रात द्रवीभूत नैसर्गिक वायू (एलएनजी) बंदर उभारण्याची अधिकृत परवानगी दिली आहे. या भव्य प्रकल्पासाठी सुमारे ८.२ अब्ज डॉलर (सुमारे ६८ हजार कोटी रुपये) इतकी गुंतवणूक केली जाणार आहे. सागरी प्रशासनाने पर्यावरण मंजुरी प्रक्रिया अत्यंत वेगाने अवघ्या ४१० दिवसांत पूर्ण केली आहे (पूर्वी यासाठी सुमारे ५ वर्षांचा कालावधी लागत असे), अशी घोषणा अमेरिकेचे वाहतूक सचिव शॉन डफी यांनी केली आहे.

प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये
  • भारतात जन्मलेले आणि अमेरिकेत तंत्रज्ञान, ऊर्जा व आदरातिथ्य क्षेत्रात यशस्वी उद्योग उभारणारे उद्योजक शरद टाक हे एसटी एलएनजीचे संस्थापक आणि सीईओ आहेत.
  • हे बंदर टेक्सासच्या माटागोर्डा किनाऱ्यापासून सुमारे १६.७ किमी दूर खोल समुद्रात निर्माण केले जाईल. यामुळे किनाऱ्यावरील जहाजांची गर्दी कमी होऊन अपघात टळण्यास मदत होईल.
  • या प्रकल्पाचे बांधकाम २०२७ मध्ये सुरू होईल आणि २०२९ पर्यंत हे बंदर पूर्ण क्षमतेने कार्यरत होईल. यात २० प्लॅटफॉर्म, ४ तरंगते गोदाम आणि समुद्राखालील पाईपलाईनचा समावेश असेल.
  • प्रकल्पाचे आर्थिक व धोरणात्मक महत्त्व

Sharad Tak LNG Port Project या बंदरामुळे अमेरिकेची एलएनजी निर्यात क्षमता ७ ते ९ टक्क्यांनी वाढणार आहे. दरवर्षी ८.४ दशलक्ष टन एलएनजी निर्यातीची क्षमता या बंदरात असेल. बांधकामादरम्यान सुमारे २,००० लोकांना रोजगार मिळेल, तर प्रकल्प सुरू झाल्यावर ८५५ कायमस्वरूपी नोकऱ्या निर्माण होतील. Sharad Tak LNG Port Project

‘यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम’चे (यूएसआयएसपीएफ) अध्यक्ष मुकेश आघी यांनी या निर्णयाचे स्वागत केले. भारत सध्या आपल्या ऊर्जेच्या गरजांसाठी विविध पर्याय शोधत असून, या प्रकल्पामुळे भारत आणि अमेरिकेत दीर्घकालीन एलएनजी व्यापाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. Sharad Tak LNG Port Project

सुमारे ८.२ अब्ज डॉलरची गुंतवणूक, ८.४ दशलक्ष टन वार्षिक निर्यात क्षमता आणि हजारो अमेरिकी नोकऱ्यांच्या निर्मितीसह एसटी एलएनजी अमेरिकेच्या ऊर्जा सुरक्षेत मोठे योगदान देईल.

— शरद टाक, संस्थापक व सीईओ, एसटी एलएनजी

Read About : AI Impact on Jobs – ‘एआय’मुळे ‘एआय’मुळे मोठा धोका, तयारीत राहा, जोहोचे संस्थापक वेम्बू यांचा इशारा

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.