Ad Advertisement Ad Advertisement

Wind Energy India : भारतात पवन ऊर्जेची क्षमता अंदाजापेक्षा जास्त; 2070 पर्यंत विजेची मागणी 11 पट वाढणार

भारतात २,९३३ गिगावॅट पवन ऊर्जेची क्षमता; TERI च्या अहवालातून मोठा खुलासा

नवी दिल्ली : Wind Energy India भारतातील ऑनशोर (जमिनीवरील) पवन ऊर्जेची क्षमता पूर्वीच्या अंदाजापेक्षा खूप जास्त आहे. देशात १५० मीटर उंचीवर ऑनशोर पवन ऊर्जेची क्षमता १,२०९.७ गिगावॅट आणि २०० मीटर उंचीवर ती तब्बल २,९३३.९ गिगावॅटच्या आसपास आहे. द एनर्जी अँड रिसोर्सेज इन्स्टट्यिूट या थिंक-टँकने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार, किमान ७.० मीटर प्रति सेकंद या वाऱ्याच्या वेगावर ऑफशोर (समुद्रातील) पवन ऊर्जेची क्षमता अनुक्रमे २२० गिगावॅट आणि २७७ गिगावॅट इतकी अंदाजित करण्यात आली आहे.

भारताची सध्याची स्थिती आणि राज्यांचा वाटा

३० सप्टेंबर २०२६ पर्यंत भारताची एकूण स्थापित पवन ऊर्जा क्षमता ५९.२० गिगावॅटवर पोहोचली होती. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये सुमारे ६.०५ गिगावॅटची विक्रमी भर पडल्यामुळे हा टप्पा गाठता आला. १५० मीटर उंचीवर अंदाजित पवन ऊर्जा क्षमतेमध्ये राजस्थान, गुजरात आणि कर्नाटक या तीन राज्यांचा वाटा सुमारे ६१ टक्के आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि तामिळनाडूचा समावेश केल्यास, या पाच राज्यांचा एकत्रित वाटा तब्बल ७९ टक्क्यांवर पोहोचतो.

२०७० चे लक्ष्य आणि विजेची मागणी

या अहवालात अंदाज वर्तवण्यात आला आहे की, वर्ष २०७० पर्यंत भारताची ग्रिडशी जोडलेली विजेची मागणी सध्याच्या पातळीपेक्षा सुमारे ११ पटीने वाढू शकते. भारताच्या नेट झिरो कार्बन उत्सर्जनाच्या उद्दिष्टानुसार, २०७० पर्यंत देशात ८९१ गिगावॅट पवन ऊर्जा क्षमतेची आवश्यकता भासेल.

  • पवन ऊर्जेच्या विकासासाठी ६ प्रमुख मार्ग
  • १. नवीन ऑनशोर पवन ऊर्जा प्रकल्पांचा विकास करणे.
    २. सध्याच्या पवन ऊर्जा प्रकल्पांचे आधुनिकीकरण करून त्यांची क्षमता वाढवणे
    ३. अधिक उंचीवर पवन टर्बाइन स्थापित करणे
    ४. पवन-सौर-बॅटरी स्टोरेजचे एकत्रीकरण करून औद्योगिक पातळीवर वीज खरेदी करणे
    ५. समुद्रात स्थिर पाया असलेले पवन ऊर्जा प्रकल्प उभारणे
    ६. समुद्रात तरंगणारे ऑफशोर पवन ऊर्जा प्रकल्प तयार करणे

Read About : Wildlife Water Scarcity in Marathwada – जंगलातील पाणवठे आटण्याच्या मार्गावर, मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण होणार ?
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.